चालकाचा डोळा लागल्याने भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला पहाटे झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे ५ वाजता हा अपघात झाला. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी आहेत.

अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत. समृध्दी महामार्गांवर अपघातांचे सत्र सुरूच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.