सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन मुलीची बदनामी

0

जळगाव: ;- सोशल मीडियावरील स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार करुन त्यावर मुलीचा चेहरा लावून अधिल फोटो व्हायरल केले. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी उघडकीस आली, याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील एका गावात ४८ वर्षीय शेतकरी वास्तव्यास आहे. दि.७ जानेवारी ते दि. २३ जानेवारी पर्यंत अज्ञात इसमाने त्या शेतकऱ्याच्या मुलीच्या नावाने अॅपचॅटवर बनावट खाते तयार केले. त्यावर मुलीचा चेहरा असलेला अश्लिल फोटो तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करीत तीची बदनामी केली. हा प्रकार उघडकीस येताच शेतकऱ्याने सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.