मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; युवक ठार

0

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क

मालवाहू चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव-ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदीराजवळ मंगळवारी २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश गणपत कुंभार (हिवरकर) (वय-४०, रा. चौघुले प्लॉट,जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

सुरेश कुंभार यांचा विटभट्टीचा व्यवसाय असून नेहमीप्रमाणे मंगळवारी २८ मार्च रोजी त्यांचा मित्र दिलीप तुकडू कुंभार यांच्यासोबत विटभट्टीवर जाण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच ४१ एच ९९८१) ने ममुराबाद रस्त्याच्या दिशेने निघाले. रस्त्यावरील मनुदेवी मंदीराजवळून जात असतांना समोरून येणारी छोटाहत्ती वाहन (एमएच १९ सीवाय ८१७३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुरेश कुंभार हे जागेवरच ठार झाले तर सोबत असलेले दिलीप कुंभार हे किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेवून जखमीस उपचारासाठी रवाना केले. दरम्यान, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मनिषा, दोन मुले निलेश आणि योगेश आणि मुलगी कोमल असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे आणि पोहेकॉ ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.