अंजनी धरणात 26.60 टक्के जलसाठा

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल धरणगाव तालुक्याचे लाईफ लाईन असलेले अंजनी धरण आत्तापर्यंत 26.60% पाण्याने भरलेले आहे अंजनी धरण क्षेत्रात गेल्या दोन महिन्यात 220 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊनही संपूर्ण पाणी पाणलोट क्षेत्रामध्ये बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये प्रथम अडवले जाते बंधारे पूर्ण भरल्यानंतर पाण्याची आवक धरणात सुरू होते.

साधारणपणे 15 ऑगस्टच्या पुढे पाण्याची आवक वाढते पाणलोट क्षेत्र सुमारे 110 चौरस किलोमीटर इतके आहे. अंजनी धरणाच्या उगमापासून धरणापर्यंत सुमारे लहान बंधारे 15 व मोठे बंधारे दहा आहेत.

एरंडोल शहरापासून दक्षिण भागात अंजनी नदीवर अंजनी धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणातील जलसाठ्यामुळे एरंडोल शहरासह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटण्यास मदत होते. याशिवाय काही प्रमाणात शेती सिंचनासाठी सुद्धा अंजनी धरणाच्या जलसाठ्यातील पाण्याचा उपयोग होतो. अंजनी नदीच्या उगम पारोळा तालुक्यातील शिरसमणी टिटवी परिसरातून होतो. उगमापासून अंजनी धरणापर्यंत अंजली नदीची लांबी सुमारे 40 ते 50 किलोमीटर इतकी आहे. पाणलोट क्षेत्रात लहान मोठे सुमारे 30 नाले विखुरलेल्या  स्वरूपात आहे.

दरम्यान गिरणा धरण 60 टक्के भरले आहे. या धरणातील जलसाठ्याच्या एरंडोल तालुक्याला सिंचनासाठी लाभ होतो, याशिवाय पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या मार्गी लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.