रासायनिक खतांच्या पुरवठ्यात नियमितता हवी – उन्मेश पाटील

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

खासदार उन्मेश पाटील हे शेतकरी बांधवासाठी नेहमीच पुढाकार घेतात आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत असून काल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या पुरवठ्यात नियमितता हवी असून या बाबीची तातडीने दखल घ्यावी तसेच पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई देण्यात यावी असे निवेदन खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना दिले.

खासदार उन्मेश पाटील यांनी काल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढून प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उप संचालक कुरबान तडवी,भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, माजी सरपंच रवींद्र पाटील, भरारी फाऊंडेशन अध्यक्ष दिपक परदेशी, मोहीम अधिकारी विजय पवार, पोखरा प्रकल्प समन्वयक संजय पवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.