‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनास बंदी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

2023 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ ने बॉक्स ऑफिसवर सर्वच रेकॉर्ड तोडले होते. चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली मात्र ॲनिमलच्या ओटीटी रिलीजबाबत वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट 26 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘Netflix’वर प्रदर्शित होणार आहे. परंतु त्याआधी चित्रपटाचा सहनिर्माता असल्याचा दावा करणाऱ्या Cine 1 Studios ने ‘ओटीटी’ सह इतर प्लॅटफॉर्मवर त्याचे चित्रपट थांबविण्याची मागणी केली आहे.

चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रेमींग वर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका cine 1 Studios ने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

cine 1 Studios ने टी सिरीज वर गंभीर आरोप केले आहेत की टी सिरीज ने कराराचे उल्लंघन केले आहे आणि एकही पैसा दिलेला नाही.प्रत्युत्तरात टी सिरीज ने सांगितले की याचिका कर्त्याला 2.6 कोटी रुपये दिले गेले आहेज्याचा तपशील न्यायालयात उघड करण्यात आला नाही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.