विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे शासकीय योजनांचा प्रचार

0

जळगाव : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र व राज्य शासनाकडून दि.१५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत काढण्यात आली असून ही विकसित भारत संकल्प यात्रा दि.१५ रोजी जळगाव दाखल झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शहरात विविध भागात शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्यात आला.

जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत विकसित भारत संकल्पना यात्रा या मोहिमेअंतर्गत शहरातील सुभाष चौक येथे जळगाव शहरातील लोकांच्या कल्याणाच्या व विकासाच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने योजनांचा प्रचार करण्यात आला. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते विकसित भारत यात्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी नगरसेवक मुकुंद सोनवणे, विशाल त्रिपाठी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, दिपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उप. आयुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, मुख्य लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, अभिजीत बाविस्कर, प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, एस. एस. पाटील, संजय नेवे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.