वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ‘अ‍ॅनिमल’ने मारली बाजी, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओलचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप जबरस्त प्रतिसाद मिळत आहे. १३ व्या दिवशी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

फक्त बॉक्स ऑफिसचं नाही तर जगभरामध्ये हा चित्रपट जबरदस्त कामे करतांना दिसत आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून असून, एक-एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. १३ दिवसात या चित्रपटाने ७५० कोटींवर कलेक्शन केले आहे. ८०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी हा चित्रपट अवघे काही आकडे दूर आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत दमदार कमाई करतांना दिसत आहे. भारतामध्ये हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचवण्यासाठी अवघे काही अंतर दूर आहे. १३ व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा इतर दिवशीच्या कमाईपेक्षा खूपच कमी आहे. १३ व्या दिवशी या चित्रपटाने १९.४२ कोटींची कमाई केली. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण ४६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तर वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये देखील ‘अ‍ॅनिमल’ची जादू कायम पाहायला मिळत आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ७५० कोटीचा आकडा पार करण्यास चित्रपटाला यश आले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ७७२.३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट दिवसेंदिवस नवा आश्चर्यकारक आकडा पार करताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.