दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत सरपंचाने केले अनोखे आंदोलन.!

0

 

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनीपंचायत समिती कार्यालया फुलंब्रीसमोर तब्बल दोन लाख रुपयांची उधळण करीत शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला असून पंचायत समितीमध्ये दाखल विहिरीचा प्रस्ताव मंजूर करताना 12 टक्के रक्कम मागितली जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला.

पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, पाणंद रस्ता अशा कामांच्या मंजुरीसाठी टक्केवारीच्या हिशोबाने शेतकऱ्याची आर्थिक लूट केली जात आहे. विहिरी प्रस्ताव मंजुरीसाठी देखील शेतकऱ्यांकडे १२ टक्के कमिशन मागण्यात आले आहे, असा आरोप करीत संतापलेल्या सरपंच साबळे यांनी पंचायत समिती समोर गळ्यातील हार घालून नोटांची उधळण करीत आंदोलन केले.

याबाबत बोलतांना साबळे म्हणाले की, गेवराई पायगा गावात विहिरीचे 20 प्रस्ताव दाखल झाले असून या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड, ग्रामरोजगार सेविकासोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी आणलेले 1 लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर पाठविले. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून 12 टक्के प्रमाणे रक्कम देण्यास सांगितले. यामुळे आज 2 लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो. पण त्यांनी पैसे घेतले नाहीत, अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.