अमृत पालचा गोळीबाराचे प्रशिक्षण देणारा व्हिडीओ चर्चेत !

0

प्रशिक्षण देणाऱ्या दोन माजी सैनिकांचा पोलिसांकडून शोध
नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

वारिस पंजाब देचा चीफ खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्याबाबत पोलीस तपासात नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. अमृतपालच्या गनरकडून फायरिंग रेंजचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. यामध्ये माजी सैनिक त्याला शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देताना दिसत आहेत.

अमृतपालच्या जल्लूपूर खेडा गावात ही फायरिंग रेंज तयार करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ पोलिसांनी जारी केला आहे. अमृतपालसोबत राहणारे लोक गोळीबाराचा सराव करताना दिसत आहेत. दरम्यान, अमृतपाल आनंदपूर खालसा फौजेचा लोगोही समोर आला आहे.

प्रशिक्षण देण्याच्या प्रकरणात पोलिसांनी 19 शीख बटालियनमधून निवृत्त झालेले दोन माजी सैनिक वरिंदर सिंग आणि थर्ड सशस्त्र पंजाबचे तलविंदर यांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दोघांचा शस्त्र परवाना रद्द केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.