शरद पवार यांचे हस्ते अमरावती येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन या ठिकाणी नवीन सभागृहाचे लोकार्पण केले. व नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पणही यावेळी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या जल्लोषात शरद पवार यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पेक्षागृह चे उद्घाटन सोहळा सुद्धा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला.

शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती एकत्रित करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याच प्रमाणे भाऊसाहेब देशमुख यांनी सुद्धा ही संस्था उभी केली. या संस्थेला अनेकांनी हातभार लावला असल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. भाऊसाहेबांची दृष्टीही दूरदृष्टी होती. शेतकऱ्यांना शेतीची माहिती व्हावी याकरिता त्यांनी कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली. त्यांच्या या कृषी प्रदर्शनात जगातील मान्यवर उपस्थित राहत होते .प्रदर्शनी 90 दिवसांची दिल्लीमध्ये राहत होती.

भाऊ साहेबांना जशी शेतीची आवड होती तशी शिक्षणाची सुद्धा आवड होती .असे शरद पवार यावेळी म्हणाले .मंचावर शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन जी देशमुख, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, क्रीडा व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, आमदार किरण सरनाईक, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.