नफ्याच्या नावाखाली तरुणाला पावणे सहा लाखात गंडवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मोहाडीरोडवरील तरुणाची ऑनलाईन ट्रेडींगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली ५ लाख ७६ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सचिन अशोककुमार मंदान (वय २५, रा. एक्झोटीक अपार्टमेंट, मोहाडी रोड जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे जनरल स्टोर दुकान आहे. इंस्टाग्राम वरून त्यांना मार्च २०२१ पासून ते आतापर्यंत ट्रेडर्स काजल या फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देईल असे आमिष दाखविले.

सचिन मंदान यांच्याकडून डिमॅट खात्याचा युजर आयडी व पासवर्ड घेऊन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अज्ञात व्यक्तीने मंदार यांच्याकडून वेळोवेळी दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. दरम्यान सचिन मंदार यांनी ५ लाख ७६ हजार १५१ रूपये भरले. मात्र त्यांना काहीच फायदा झाला नसल्याचे समजल्यावर त्यांनी जळगाव सायबर पोलीसात तक्रार दिली.

सचिन मंदान यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रेडर्स काजल फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाचे इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.