“नवनीत राणा जेलमध्ये..”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय पक्षाचे नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राणांना जेल होणार

नवनीत राणा मुलुंड कोर्टात हेलपाटे मारत आहेत. तसेच येत्या ६ महिन्यांत त्या जेलमध्ये दिसतील, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. आमदार रवी राणा यांच्याबाबत प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत हा दावा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला. म्हणूनच रवी राणाची मिसेस कोर्टात घिरट्या घालत आहेत, सहा महिन्यांमध्ये ती जेलमध्ये दिसेल, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात नवनीत राणांना जेल होणार असल्याचे संकेत आंबेडकर यांनी दिले आहेत.

आम्ही केवळ.. 

वंचित बहुजन आघाडीला अजूनपर्यंत महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया’ मध्‍ये आमंत्रित करण्‍यात आलेले नाही. वंचितची काँग्रेस किंवा राष्‍ट्रवादी शरद पवार गटासोबत कोणतीही बोलणी झालेली नाही. आम्ही केवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांचे ठरलेले नाही, असं स्पष्टीकरण आंबेडकरांनी केले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.