तुमचे आधार कार्ड दुसऱ्याने वापरले तर नाही ना ? मग वाचा हि महत्वाची माहिती

0

नवी दिल्ली ; – प्रत्येकाचे आधार कार्ड तयार करताना त्याचे रेकॉर्ड केले जाते. तसेच तुम्ही तुमचा आधार कोणत्या ठिकाणी कोणत्या कामासाठी वापरला याची महत्वाची माथी असते . मात्र आपले आधार कार्ड कुणीतरी वापरत नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायला हवे. याबाबतची माहिती ऑनलाईन कशी तपासून तुमचे आधारकार या रेकॉर्डवरून वापरले गेले कि नाही हे आपणास कळू शकणार आहे.

सर्वप्रथम तुम्ही uidai वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. येथे तुम्हाला ‘Aadhaar Authentication History’ चा पर्याय दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. हा पर्याय तुम्हाला My Aadhaar सेक्शनमध्ये दिसेल. याशिवाय तुम्ही https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history या लिंकवर क्लिक करावे लागेल .

यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाऊन यात १२ अंकी आधार क्रमांक टाकून यानंतर सिक्युरिटी कॅपच्या व्यवस्थित करून ओटीपी पाठविण्यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर आधार कार्डच्या नोंदणी कृत मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर
आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले याची संपूर्ण माहिती मिळेल, हे रेकॉर्ड फक्त गेल्या सहा महिन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. हे रेकॉर्ड मिळाल्यानंतर, आपण आधारचा वापर केला आहे की नाही हे तपासू शकाल. हे तपासणे आवश्यक आहे कारण इतर कोणीही तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करणार नाही ,याची काळजी घ्यावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.