महिलेच्या एटीएमचा कार्डचा वापर करून अज्ञात चोरट्याने ५१ हजारांचा लावला चुना

0

अमळनेर ;- महिलेच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून अनोळखी व्यक्तीने बँक खात्यातून ५१ हजार ७०० रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना अमळनेर शहरातील पैलाड भागात घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुरुवार १ मे रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैलाड भागात सविता प्रल्हाद पाटील वय 35 या महिला राहत असून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँकेच्या एटीएम कार्डचा गैरफायदा घेवून २६ मे रोजी आणि २९ मे रोजी या दोन दिवसात महिलेला कोणतीही माहिती नसताना बँक खात्यातून एटीएमच्या मदतीने प्रत्येकी ४० हजार आणि ११ हजार ७०० असा एकूण ५१ हजार ७०० रुपयांची फसवणूक करून चोरी केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलने गुरुवार १ जून रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर पुढील तपास करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.