मंगरूळ – शिरुड रस्त्यावरील हा खड्डा ठरतोय जीवघेणा..

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मंगरूळ ते शिरूड हा ४ किलोमीटर अंतर असलेला रस्ता असुन मंगरूळ पासून १ किलोमीटर शिरुडकडे येणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. याबाबतीत अशी माहिती मिळाली की, मंगरूळकडुन शिरूडकडे येणाऱ्या रस्त्यावर एक काँक्रीट तयार करण्याचा कारखाना होता. सध्याच्या कारखाना काम आटोपून बंद झाला. त्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या रस्त्याला ग्रहण लागले आहे.

नंतर वाहतुकीमुळे रस्ते खराब होऊ लागले आहेत. नंतर मोठं- मोठे खड्डे होत आहेत. रस्त्याच्या साईड पट्या देखील घसरू लागल्या होत्या, त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागत होती. काही कलांतराने त्या १ की.मी रस्त्याची डागडुजी कऱण्यात आली होती. डागडुजी होऊन साधारण १ वर्ष होत नाही तोच पुन्हा हीच परिस्थिती जाणवत आहे.

१ कि.मी रास्ता पूर्णपणे दयनीय झाला आहे. डागडुजी केलेल्या रस्त्यामध्ये पुन्हा मोठे खड्डे तयार झाले आहेत. या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात. तर त्याच रस्त्यावरील भला मोठा १ खड्डा हा जीवघेणा ठरत आहे. या रस्त्याचा शिरुड, कावपिंप्री, ईंद्रापिंप्री, सुमठाणे, ईंधवा या गावातील वाहनधारकही वापर करीत असतात. हा रस्ता जिल्हापरिषदेच्या अंतर्गत येत असुन संबंधितांनी ताबडतोब दखल घ्यावी व नादुरुस्त झालेला रस्ता हा दुरुस्त करावा. अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.