अमळगाव येथे तरुणाची आत्महत्या

0

अमळनेर : कुटुंबीय लग्नासाठी बाहेर गेलेले असताना भिकन भगवान थोरात (वय ४०, रा. अमळगाव) यांनी दि. ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारवड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील जयप्रकाश नगरात भिकन थोरात हे आई, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना दि. ११ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.