खुशखबर ! आलिया-रणबीर झाले आई – बाबा..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी छोट्याशा परीचे आगमन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलिया आई-वडील झाल्यावर संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंब आनंदी आहे.

https://www.instagram.com/p/CknJuW3LtxC/?utm_source=ig_web_copy_link

आलिया आणि रणबीरसाठी हे वर्ष खूप खास होते. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले. जूनमध्ये आलियाने पुन्हा तिच्या गर्भधारणेची घोषणा केली आणि त्यानंतर आता दोघेही आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याचे चाहते सोशल मीडियावर खूप खुश असून लक्ष्मी घरी आल्याचे सांगत आहेत. मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.