Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»निवडणुकीत अजितदादांकडून गुंडांचा वापर ; रोहित पवारांचा गंभीर आरोप
    ताज्या बातम्या

    निवडणुकीत अजितदादांकडून गुंडांचा वापर ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 19, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बारामती ;- राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जवळ येतील तसे दोन्ही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. प्रचारादरम्यान, दोन्ही बाजूनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीत गुंडांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    रोहित पवार म्हणाले, आम्ही इथे विचारांची लढाई लढत आहोत. महाशक्तीच्या विरोधात लढत आहोत. लोकांची शक्ती आपोआप आमच्याबरोबर येईल. आज आम्ही शक्तिप्रदर्शन करणार नाही . काही लोक शक्तिप्रदर्शन करतील त्यांनी पिंपरी-चिंचवडवरून प्रचारासाठी माणसे आणली आहेत. तसेच इलेक्शनच्या काळात अनेक गुंडांना बाहेर काढले जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गुंडांचा वापर अप्रत्यक्षपणे धमकी देण्यासाठी करत आहेत, असे रोहित पवार म्हणाले. या वेळी रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सलमान खानच्या घरी जायला वेळ आहे. परंतु, पुणे शहरात गोळीबार सुरू असतानाही इथले पोलिस आयुक्त काहीच बोलत नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्तांना पुण्यात कशासाठी आणले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    ajit pawar Baramati Rohit Pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif