नुसती भाषणे करून पोट भरणार का ?

अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी या भागातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले होते. त्याचे पुढे काय झाले ? असा सवाल उपस्थित करून केवळ भाषणे करण्याची कामे केली आहेत. मी तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करील, पण नुसती भाषणे करून पोट भरणार आहेत का? अशा शब्दात पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. या मेळाव्याला महायुतीमधील नेते मंडळीही उपस्थित होती. पवार म्हणाले, तुम्ही लोकांनी त्यांना 15 वर्षे सुप्रिया सुळे यांना निवडून दिले. पण तुम्हाला काहीच मिळाले नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, सुनेत्रा पवारांना एकदा निवडून द्या, त्यांचे काम नक्कीच दिसून येईल.

आजवर जिह्यातील जनता माझ्या पाठिशी उभी राहिली आहे. याही निवडणुकीत माझ्या पाठिशी उभी राहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यावे, तसेच माझ्याकडे काही कार्यकर्ते आले आणि म्हणाले की, दादा तुम्ही केलेली कामे आताच्या खासदारांनी त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तिकेमध्ये छापली आहेत. मी केले, मी केले. आहो, मी बारामतीमधील सर्व इमारती बांधल्या आहेत. मी हे केल,हे ते केल. तर मग भोर, वेल्हा या तालुक्मयामध्ये काय कामे केली, हे पण सांगावे, पण त्यांनी या दोन्ही ठिकाणी काहीच काम केले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विकासाला मत द्या !

मागील दहा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपला देश प्रगतीपथावर आहे. राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतांनी निवडून द्यावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.