परिसर मुलाखतीमध्ये चार विद्यार्थ्याची निवड

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये रसायनशास्त्र प्रशाळेतील एम.एस्सी. (पॉलीमर केमिस्ट्री, ऑरगनिक केमिस्ट्री आणि इन्डस्ट्रीयल, ॲनॅलिटीकल) ह्या विषयांच्या चार विद्यार्थ्यांची जळगाव येथील सिध्दार्थ कार्बोकेम प्रो. लि. या कंपनीत निवड झाली आहे.

या परिसर मुलाखतीसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या त्यात वैभव पाटील, उपेंद्र तायडे, जयकुमार देशमुख, निलेश माळी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक वेतन २.१६ लाख रक्कम देण्यात येणार आहे. केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर श्रीमती सोनाली दायमा यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. कंपनीचे व्यवस्थापक सुधीर कुलकर्णी, गुणवत्ता कक्षाचे प्रमुख जितेंद्र चौधरी, सहायक व्यवस्थापक अविनाश पाटील यांनी मुलसखती घेतल्या. यावेळी रसायनशास्त्र प्रशाळेचे प्लेसमेंट समन्वयक डॉ. अमरदीप पाटील, व पॉलिमर केमिस्ट्रीचे विभाग प्रमुख प्रा. विकास गिते व उपस्थित होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. धनंजय मोरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.