..तर तिने गप्प घरी बसून संन्सास घ्यायचा !

अजित पवारांनी दमानियांचे चॅलेंज स्वीकारले

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. या प्रकरणी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर टीका करताना दमानिया यांनी ही मागणी केली होती. आता दमानिया यांनी केलेल्या मागणीवर थेट अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

अंजली दमानिया यांनी दिलेले नार्को टेस्टचे चॅलेंज अजितदादांनी स्विकारले. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, माझी नार्को टेस्टची तयारी आहे. पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो. तर तिने परत कुठे तुमच्या पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्सास घ्यायचा. आहे का तिची तयारी ? अजित पवारांच्या या विधानानंतर अगदी काही वेळातच अंजली दमानिया यांनी एक्सवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी अजित पवारांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. अजित पवारांनी मी गप्प घरी बसावे आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा हे मला मान्य आहे. कधी करणार नार्को टेस्ट ते लवकरात लवकर कळवा, नार्को टेस्टचे प्रश्न मी पाठवेन, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांनी अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी केलेल्या टीकेवरून संताप व्यक्त केला होता. सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना रीचार्जवर काम करणारी बाई अशी टीका केली होती. मला ? मी काय आहे, आणि किती सिधांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा ? का ? त्यांना राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून ? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता? मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांचा कडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे. असले थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स आणि त्यांची मेंटालिटी त्यांनी त्यांच्या खिश्यात ठेवावी. मला इतर महिला राजकारण्यांची प्रतिक्रिया पण हवी आहे. कारण असली थर्ड ग्रेड भाषा राजकारणात पूर्ण पणे थांबलीच पाहिजे. असे दमानिया यांनी एक्सवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.