हॉटेल सारखा चमचमीत पनीर टिक्का

0

खाद्यसंस्कृती विशेष

पनीर टिक्का म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर टिक्का आणि रोटी ही अनेकांची पहिली पसंती असते. असाच

हॉटेल सारखा चमचमीत पनीर टिक्का घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहुयात..

 

साहित्य:

* २०० ग्रा. पनीर

* १०० ग्रा. दही

* २५ ग्रा. मैदा

* लसूण

* आलं

* १/२ चमचा जीरे पावडर

* १/२ चमचा गरम मसाला

* १ मिली. ऑरेंज कलर

* ५० ग्रा. बटर

* ७५ ग्रा. टोमॅटो

* ३० मिली. क्रीम

* १/२ चमचा लाल मिरची

* १/२ चमचा कसुरी मेथी

* मीठ

 

कृती :

* दह्यामध्ये ऑरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा.

* पनीरचे तुकडे तळून घ्या.

* एका पातेल्यात लोणी टाकून त्यात आलं, लसूण टाकून २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजा.

* नंतर दही क्रीम टाकून भाजून त्याने तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाका.

* पनीर बाउलमध्ये ठेवा.

* नंतर क्रीम व कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

मो. ९८९२१३८१३२

 

Leave A Reply

Your email address will not be published.