महाराष्ट्रात आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; शरद पवार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी खूप मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास ४० आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदार यांनी मंत्रिपदाची शपत घेतली आहे. सर्वांना एजकच उत्सुकता होती ती म्हणजे शरद पवार यांची काय प्रतिक्रिया येते, तर आता शरद पवार (Sharad Pawar) या संपूर्ण घटनेनंतर आता ॲक्शनमोड आले आहे.

शरद पवार आज कराडमध्ये दाखल झाले असून, त्यांनी शायवंतराव चव्हाण (Shaywantrao Chavan) यांच्या समाधीस्थळा असलेल्या प्रीतिसंगमावर यशवंतराव समाधीचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी जमलेले नागरिक आणि कार्यकर्ते यांना संबोधन केले. बोलतांना शरद पवार म्हणाले कि, यशवंराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे असं ते म्हणाले.

सोबतच, महाराष्ट्रात आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा फोडाफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमीका काही प्रवृत्तींनी घेतली आहे, पण या फोडाफाडीचा त्यांना काही फायदा होणार नाही. अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रातील सामान्य जनता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही. असंही सादर पवार कराड मध्ये बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.