बॅक वॉटरमुळे ऐनपुर-निंबोल गावाचा संपर्क तुटला

पुनर्वसनाचा प्रश्न कायमच

0

ऐनपुर ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने ऐनपुर येथील नदी नाले बॅक वाटरने भरून गेले आहे तर ऐनपुर निंबोल या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे आज शनिवार असल्याने ऐनपुर गावाचे आठवडे बाजार असल्याने या बाजारात येणाऱ्या बहुतेक विक्रेते आणि निंबोल, विटवे तसेच लहान मोठ्या खेड्यातील लोकांना याच रस्त्याने यावे लागते. विक्रेत्या आणि बाजारात येणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग अवलंबावा लागण्याची शक्यता आहे म्हणजेच एकंदरीत त्यांना कमालीची कसरत करावी लागणार आहे.

तसेच हतनूर बॅक वाटरचे पाणी व पावसाचे पाणी सुरूच असल्याने त्याच रस्त्याने रहिवास असलेल्या काही पावरा आदिवासी बांधवांना तसेच या वाढत असलेल्या बॅक वाटरच्या पाण्याच्या काही अंतरावरच बऱ्याच लोकांचा रहिवास आहे. ही गंभीर समस्या प्रशासनासमोर आहे.

घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमच

पावसाळ्यात सतत कमी जास्त पाऊस पडल्याने हतनूर बॅक वाटरचे पाणी वाढून नदीकाठी रहिवास असलेल्या लोकांना याचा धोका निर्माण होतो तसेच या समस्येसाठी ऐनपुर पुनर्वसन समितीमार्फत २०१६ साली पासून ते अद्यापपर्यंत वेळोवेळी विविध असे निवेदन, आंदोलन, भूमिगत आंदोलन हे करण्यात येत आहे.  तरी प्रशासनाकडून कोणतेही ठोस अशी भूमिका होत नसल्याचे समजते. अशा समस्येचा धोका उद्भवल्यास यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न मात्र ही परिस्थिती बघून निर्माण होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.