मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासकपदी नियुक्ती

0

जळगाव:;- जळगाव महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षाची मुदत रविवारी संपुष्ठात येत असून त्यापुर्वी शासनाच्या नगरविकास विभागाने मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. याबाबत नगरविकास विभागाचे आदेश शुक्रवारी महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर निवडीसाठी दि. १८ सप्टेंबर २०१८ रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेला पाच वर्ष पुर्ण होत असून २०१८ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत १७ सप्टेंबर रोजी संपुष्ठात येत आहे. परंतु निवडणुका वेळेवर होणार नसल्यामुळे महापालिकेवर प्रशासक राजवट येणार असल्याचे निश्चित होते. दरम्यान, दि. १५ शुक्रवार रोजी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुळकर्णी- छापवाले यांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्त आदेशात नमुद करण्यात आले की, राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या सर्व स्थानिक संस्थाच्या निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्यामुळे संबंधित नागरि संस्थाची मुदत संपताच तेथे प्रशासक नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदी व विशेष कलम ४५१ अ च्या १ ( अ ), १ ( ब ) मधील तरतुदीनुसार रविवार दि. १७ रोजी मुदत संपत असलेल्या जळगाव महापालिका येथे प्रशासक पदावर आयुक्त जळगाव महापालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचीसंपताच प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारावा व अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी. शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या प्रशासकपदाचा पदभार सोमवार दि. १८ पासून घेणार आहेत..

दरम्यान महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत रविवार दि. १७ पूर्ण होत आहे. त्यामुळे महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील उद्या दि.१६ रोजी आपला पदभार सोडणार आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.