गावठी कट्टे बाळगणारे तिघे जेरबंद

0

अहमदनगर :- जिल्हा पोलीस दलाने गावठी कट्टे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कडक मोहीम हाती घेतली आहे. दररोज या प्रकरणी कारवाई केली जात असून यात नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे येथील गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघा सराईतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित लखन आल्हाट, लखन उर्फ लक्ष्मण सरोदे व अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट असे अटक करण्यात आलेल्या तिघा इसमांची नावे आहेत. आरोपींना भिस्तबाग महाल, सावेडी परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आले. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, १ हजार रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुसे, ७० हजार रुपये किंमतीची विनानंबरची मोटारसायकल असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आर्म अॅक्ट कायदा कलम ३/२५/७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस नाईक रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.