युवकांचे मानसशास्त्र.. स्मार्ट गोल सेटिंग (भाग दोन)

ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळे

0

लोकशाही विशेष लेख

मानवी स्वभावातील दोष, आर्थिक अडचणी, तांत्रिक अडचणी, मानसिक आधाराची कमतरता, इतरांची ध्येय प्रति अवास्तव टीका, जीवनातील विशिष्ट घडणारे प्रसंग आणि त्याचा ध्येयाच्या प्राप्ती वर होणारे परिणाम, ध्येयप्राप्तीच्या बाबतीत असलेल्या भापट कल्पना आणि पूर्वग्रह, ध्येयप्राप्तीसाठी सातत्याचा अभाव, ध्येयप्राप्ती संबंधी असणारी कमजोर मनवृत्ती आणि बदलत जाणारी अभिवृत्ती, निश्चित एकाच ध्येयाचा अभाव, ध्येयाशी निगडित आदर्श व्यक्तींचा अभाव, व्यक्तीची टाईमपास करण्याची मनोवृत्ती, यासारखे त्या बाबी यासारखे घटक ध्येय प्राप्तीच्या मार्गात निश्चित अडथळे म्हणून ठरतात. या ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळ्यांवर मात कशी करायची? हे एक आत्मसात करावयाचे कौशल्य आहे. त्यासाठी स्वतःची श्रद्धास्थाने शोधा त्यातून शक्ती निर्माण होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी आई भवानी, आई जगदंबा, त्याचप्रमाणे महादेवावर रक्ताभिषेक करून वेळोवेळी शपथ आणि संकल्प हे केले होते. ध्येयाच्या मार्गातील अडचण कुठल्या स्वरूपाची आहे याचा अगोदर शोध घ्या आणि त्या अडचणी वर योग्य पर्याय शोधण्या साठी सतत प्रयत्नशील राहा., त्या समस्येचा अधिक! अधिक समस्या सोडवीत असताना विचार प्रकृत इनसाईड लर्निंग चा वापर करा, ध्येयाशी संबंधित एखादी समस्या निर्माण झाल्यावर ठरवलेले ध्येय आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहे या विषयाचा दृढ निश्चय आपल्या मनाशी त्यावेळी पुन्हा पुन्हा करा. तशी मनाला पुन्हा पुन्हा सूचना द्या, समस्या आपली आणि त्या समस्येवर उत्तरही आपले आपल्या जवळ असते. या विधानावर विश्वास ठेवा आणि समस्येच्या दिशेने योग्य उत्तर स्वतःच शोधा स्वयंप्रेरणेने उत्तर नक्की मिळेल. ध्येयप्राप्तीच्या बाबतीत निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सर्व पर्यायांची यादी तयार करा. ध्येय प्राप्तीसाठी ध्येयाशी संबंधित योग्य माणसे जोडा आणि त्यांचा योग्य उपयोग करा.

ध्येयाशी आपण एकनिष्ठ कसे असले पाहिजे?

ध्येय निश्चिती आणि ध्येयप्राप्ती यासाठी प्रामुख्याने दृढ निश्चय करून बेभान होऊन काम करणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक कृती करत असताना ही कृती आपल्या ध्येयाशी कशी निगडित आहे याचा विचार करा ती जर कृती ध्येयाशी निगडित नसेल तर ती करू नका. इतरांच्या अवास्तविका टिके ची अजिबात चिंता करू नका ध्येयाचे रोज मूल्यमापन करा ध्येय समावेशक आज मी कुठल्या कुठल्या कृती केल्या याचे मूल्यमापन करा. ध्येय प्राप्ती आणि ध्येयाकडे वाटचाल करीत असताना टेक्निक म्हणजे उघड्या डोळ्यांनी सदरचे ध्येय हे पूर्ण होत आहे. पूर्ण झाले आहे. अशा पद्धतीचे चित्र डोळ्यासमोर तयार करून ते रंगवा.

ध्येय गाठत असताना काही अडचणी येत असतील तर त्याची विश्वासातील लोकांबरोबर चर्चा करा. ध्येय सिद्धी ची दिवा स्वप्न बघा पण विकृती नको ज्या व्यक्तीने आपल्याशी निगडित ध्येय साध्य केले आहे त्यांच्याशी चर्चा करा त्यांचे आत्मचरित्र वाचा यांचे आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवा. आपले ध्येय रोज एक वहीवर सकाळी दहा वेळा लिहा. ध्येयवेडे बना.

युवा मित्रांनो ध्येय निश्चिती आणि स्मार्ट गोल बघितल्या नंतर आपल्याला या बाबतीत काही अडचणी अजून निर्माण होत असल्यास आपण लेखकाशी संपर्क साधून त्याबाबत विस्तृत चर्चा करू शकतात त्याच बरोबर आपण कुठले ध्येय हा लेख वाचून निश्चित केले आहे सदरचे ध्येय आपण कुठे कुठे लिहिले आहे याबाबत आपण आपले मित्र लेखक यांच्यासोबत चर्चा करा.

आपले ध्येय शक्य झाल्यास आरशावर फळ्यावर जसे लिहितो त्या पद्धतीने लिहिण्यास काही एक हरकत नाही. किंवा आपण बघत असलेल्या आरशा जवळ फळ्यावरती आपण आपले ध्येय लिहू शकतो. आरसा आपण प्रत्येक वेळी येता जाता बघतो जेणेकरून आपल्याला आपल्या ध्येयाची तो आरसा सतत आठवण करून देत जाईल.

प्रो. डॉ. आशिष एस. जाधव/बडगुजर
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा
9373681376

Leave A Reply

Your email address will not be published.