युवकांचे मानसशास्त्र; स्मार्ट गोल सेटिंग (भाग एक)

0

लोकशाही विशेष लेख

मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा यांना प्रामुख्याने नैसर्गिक अस महत्व किंवा ज्याला आपण आधार आहे असं म्हणतो. व्यक्तीच्या मनात येणाऱ्या विचारांपैकी त्याच्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छेन पैकी जवळजवळ ७0% इच्छांचे ती व्यक्ती दमन करते. त्याच्या या इच्छा त्याचे विचार व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये जाऊन बसतात. ज्या विचारांना ज्या इच्छेना काहीतरी आधार काहीतरी महत्त्व आणि त्याची काहीतरी वर्तमान भविष्यात उपयुक्तता असते असे विचार काही वेळेला व्यक्तीच्या नकळत ते उफाळून येतात ते विचार त्या इच्छा या दृढ होतात त्याच्याच रूपांतर ध्येय मध्ये उद्दिष्टांमध्ये होते.

ध्येय निश्चित करीत असताना किंवा ठरवीत असताना ध्येयाच्या मागचं उद्दिष्ट निश्चित असू द्या सदरच्या ध्येयामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे हे याची स्पष्ट कल्पना ध्येय निश्चित करणाऱ्या ध्येय ठरवणाऱ्या व्यक्तीला समूहाला ही असली पाहिजे. त्या संदर्भात आपल्या सभोवतालच्या आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या आपल्या विश्वासातील व्यक्तींशी त्याबाबत चर्चा करा. ध्येया मधून आपल्याला काय निष्पन्न होणार आहे. या गोष्टींचा सारासार विचार विनिमय करा. सदरचे ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला कुठ कुठल्या कौशल्यांची कुठल्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे. याबाबत विचार करा त्यातील किती गोष्टी आज आपल्या जवळ आहेत किती कौशल्य आज आपल्या जवळ आहे आणि जे कौशल्य ज्या गोष्टी आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आहे त्या गोष्टींची यादी करून ती क्रमाक्रमाने त्या गोष्टीचे कौशल्य आत्मसात करा.

त्यासाठी सामूहिक व्यक्तिगत छोट्या छोट्या भागांमध्ये आपले नियोजन करा त्याबाबत च्या जबाबदाऱ्या सामूहिक ध्येय असेल तर आपल्या समूहातील विश्वासू जबाबदार व्यक्तींना ते द्या. त्याचबरोबर सदरचे ध्येय हे आपल्या स्वतःच्या मूल्यांशी आपल्या समूहाच्या समूहातील मूल्यांशी त्यातील संस्कृती परंपरा मान्यता यांच्याशी मिळते जुडते आहे का नाही याबाबत चा आढावा घ्या त्या ध्येयाच्या संदर्भात उद्दिष्टाच्या संदर्भात अजून काही व्यक्ती किंवा समूह यांनी प्रेरित होऊन ते उद्दिष्ट ते ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत का याबाबत ऐतिहासिक संदर्भ त्याबाबतची माहिती घ्या. ध्येय साध्य करत असताना स्वतःची वास्तववादी शारीरिक मानसिक स्थिती त्याचबरोबर स्वतःच्या आणि समाजाच्या क्षमतांचा पूर्ण विचार करा. त्याचबरोबर ध्येय साध्य करीत असताना योग्य त्या अडचणींची आधी जाणीव करून घ्या.

पूर्वपार काळापासून राजे शाही ज्यावेळेस अस्तित्वात होती त्यावेळेस प्रामुख्याने राज दरबार भरून त्या ठिकाणी ध्येय उद्दिष्ट याबाबत सामूहिक चर्चाही राज्याच्या सिंहसणाखाली राजा विराजमान सिंहासनावर असताना होत होती तर आजच्या काळामध्ये प्रामुख्याने हे उद्दिष्ट हे ध्येय देशासाठीचे समाजासाठीचे साध्य करण्यासाठी प्रामुख्याने भारतीय लोकशाही मध्ये संसद किंवा त्यालाच आपण लोकसभा, राज्यसभा असे म्हणून संबोधतो ही संकल्पना हे लोकशाहीचे संसदभवन आहे.

स्मार्ट अनॅलिसिस
S : specific :
आपले ध्येय स्पष्ट असावे नेमके मला काय करायचे आहे. याची स्पष्ट जाणीव असावी त्यात संधीत्ता नको. प्रामुख्याने लेखक म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी विकास आराखडा सादर केला असताना त्यात आपण असं म्हटलं आहे की जिल्ह्यात एक भव्य सूर्य मंदिर हे तयार करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने आपण सूर्य मंदिरा बाबतची स्पष्टपणे वाचता केली आहे. व्यवसायिक ध्येय ठरवीत असताना प्रामुख्याने मला व्यवसायातून भरपूर पैसे कमवायचे आहे असं म्हणण्यापेक्षा मला वृत्तपत्र विक्री इलेक्ट्रॉनिक मीडियातील चित्रफिती बनवून पैसे कमवायचे आहे हे झाले स्पष्ट ध्येय.

M : Measurable
ध्येय विशिष्ट निकषांसह मोजणीत असावे आपण आपले कार्य ध्येय किती प्रमाणात पूर्ण केले किती अपूर्ण राहिले याची माहिती घेता आली पाहिजे. वर आपण म्हटले आहे की मला वृत्तपत्र विक्री आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून चित्रफिती बनवून पैसे कमवायचे आहे. पण सदरच्या वाक्यामध्ये किती पैसे कमविणार हे अनुत्तीर्ण करणारे वाक्य ध्येय आहे. म्हणून मला वृत्तपत्रे विक्री आणि चित्रफिती बनवून दहा लाख रुपये कमवायचे आहे हे झाले अचूक ध्येय वाक्य. त्याचप्रमाणे आम्हाला सूर्य मंदिर आमच्या जिल्ह्यात दहा लाख चौरस किलोमीटर मध्ये बनवायचे आहे यामुळे आपल्या ध्येयपूर्ती उद्दिष्टांत मधली संधीदत्ता कमी होते.

R : Realistic
ध्येय हे वास्तवादी असावे ते प्रयत्न अंती साध्य करता आले पाहिजे. उगाचच अशक्य उद्दिष्ट ध्येयांच्या मागे लागण्यात अर्थ नसतो. त्यामुळे आपले आर्थिक शारीरिक मानसिक नुकसानच होते. परिणामी व्यक्ती वैफल्यग्रस्त होऊ शकतो. वास्तववादी ध्येयाच्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट अशी आहे की शास्त्रज्ञांच्या मनातील परिकल्पना सुरुवातीला सर्वसामान्य व्यक्तीला हस्यास्पद वाटतात पण त्या कल्पना वास्तवात साकार झाल्यावर सर्वसामान्य व्यक्ती फक्त बघण्याची भूमिका घेतात. सुरुवातीला पंख असणारे आकाशात भ्रमण करणाऱ्या यान बाबतची कल्पनेबाबत कुणालाही विश्वास बसत नव्हता परंतु ज्यावेळी आपण अवकाशात विमान उडताना बघतो त्यात बसतो त्यावेळी आपल्याला त्याची सत्यता ही पटते असे अनेक शोध आहे.
भारतात समुद्राच्या तळाशी राजमहल असल्याचे उदाहरणे आहे बऱ्याच ठिकाणी समुद्रात उत्कृष्ट प्रकारच्या बांधकाम प्रतिकृती जगात तयार झालेल्या आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जिल्ह्यात तापी पात्रात भव्य सूर्य मंदिराचे बांधकाम करून ते साकारायचे आहे असे ध्येय उद्दिष्ट अवास्तव कदापिही होऊ शकत नाही. आधुनिक युगात व्यक्ती पृथ्वीवर राहून चंद्रावर वास्तव्य आणि पर्यटनाला जाण्याबाबतचे नियोजन करीत आहेत. हे वास्तव आहे त्यामुळे अशक्य ते काहीही नाही असे या ठिकाणी आपल्याला म्हणावे लागेल.

T : Timely
आपले ध्येय वेळेवरच पूर्ण झाले पाहिजे वेळ निघून गेल्यावर होणारा फायदा विशेष फायदेशीर नसतो. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ काल मर्यादा असते आपण आपल्या जळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा सादर करीत असताना प्रत्येक उद्दिष्टाची एक काल मर्यादा ही निश्चित केली आहे. जसे की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये भगवान सूर्याचे मंदिर दहा वर्ष काल मर्यादेच्या आत पूर्ण करायचे आहे. आपण आपल्या कामाला ध्येयाला विशिष्ट अशी काल मर्यादा घालून दिली नाही तर सदरची कामे ध्येय ही कालबाह्य होऊन जातात. समूहाला काल मर्यादा निश्चित करून दिल्यावर समूह अधिक ऊर्जा शक्तीने सदरचे ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करतात म्हणून ध्येय उद्दिष्ट ठरवीत असताना काल मर्यादा निश्चित असणे गरजेचे आहे.

प्रो. डॉ. आशिष एस. जाधव/बडगुजर.
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
9373681376

Leave A Reply

Your email address will not be published.