अल्पवयीन मुलीच्या तोंडावर अँसिड फेकण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा

0

जामनेर ;-तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तोंडावर ॲसिड टाकून मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून एका विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत राहायला असून दि.२८ सप्टेबर ते १० ऑक्टोबर या दरम्यान गावातील एक संशयित आरोपी हा १४ वर्षीय मुलीचा पाठलाग करीत असतांना त्याने मुलीला शिवीगाळ करीत माझ्याशी निकाह करशील का ? तु मला बाजारात भेटत जा जर तु नाही भेटली तर मी तुझ्या तोंडावर ॲसिड टाकेल तु जर माझी झाली नाही तर मी तुला दुसर्याची होवू देणार नाही अशी नेहमी धमकी देत असल्याने घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या घरी सांगितला त्यानंतर पहूर पोलिसात धाव घेत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून एका विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.