आजारी पतीला रुग्णालयातून घरी घेऊन जाताना अपघात; पत्नी जागीच ठार, ३ जखमी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दि. २ डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली आहे. नाशिक येथे पतीवर उपचार करून रावेर येथे गावी परतत असताना खांबावर कार धडकल्याने सावित्री सुनील हसकर (५०), रा. रावेर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर (रा. रावेर) यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान उपचारासाठी ते अधून-मधून तेथे जात असतात. शुक्रवारी उपचार घेऊन रात्री नाशिक येथून रावेर येथे ते आपल्या चारचाकी वाहनाने घरी परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सावित्री हसकर, अन्य एक महिला व मित्र होते. कार नशिराबाद टोलनाक्यानजीक पोहचली त्या वेळी ती एका खांबावर धडकली. त्यात सावित्री हसकर या जागीच ठार झाल्या. तसेच चालकाचा हात व पाय फॅक्चर झाला आहे तर अन्य दोघांनाही मार लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.