अवघड वाहनाचा तिहेरी अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नेत्रक-शेवाळे या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांचा विचित्र तिहेरी अपघात झाला आहे. महामार्गाची अवस्था बिकट असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातून गेलेल्या नेत्रक- शेवाळे या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली सून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहे. यामुळे वाहनधारकांनी गाडी चालवितांना मोठी कसरत होत आहे. महामार्गावरील भले मोठे खड्डे वाचवण्याच्या नादात तीन अवजड वाहन एकमेकांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. चावरा हायस्कूल जवळ हा अपघात झाला असून अपघातामुळे एक ट्रक पलटी झाली आहे.

वाहतूक झाली विस्कळीत
तीन वाहनांच्या अपघातात सुदैवाने जीविद्धानी ठरली असून, चालक किरकोळ जखमी झाला आहे. या तिहेरी अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या रंग लागल्या असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले ऑन वाहतूक सुरळीत करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.