निवृतीच्या ३ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा खुलासा, व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

५ ऑगस्ट २०२२ हा दिवस क्रीडा रसिकांसाठी खूप दुःखाचा दिवस होता. असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. याच कारण म्हणजे, याच दिवशी सर्वांचा आवडता खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या धमाकेदार कारकिर्दीनंतर चाहत्यांच्या लाडक्या धोनीनं सोशल मीडियावर पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या सर्वच चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. ५ ऑगस्ट रोजी धोनीनं केवळ औपचारिक घोषणा केली, त्यापूर्वीच धोनीनं आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला होता. एका कार्यक्रमात स्वतः धोनीनं यासंदर्भात माहिती दिली असून, सध्या धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

२०१९ च्या विश्वचषकादरम्यान धोनीनं शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळला होता. आता ३ वर्षानंतर धोनीनं स्वतःच हे गुपित उघड केलं आहे. धोनीनं नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात निवृतीबाबत मोठा खुलासा केला आहे. २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतरच मी स्वतः निवृत्ती घेतली होती. २०२९ च्या विश्वचषकाच्या सामन्यात धोनी मोक्याच्या क्षणी धावबाद झाला आणि भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता.

३ वर्षांनी धोनीचा मोठा खुलासा
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या निवृत्तीबद्दल बोलतांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये धोनी म्हणतोय कि, जेव्हा तुम्ही जवळचा सामना गमावता, तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होत. माझ्यसाठी व टीम इंडियासाठी तो शेवटचा दिसावस होता. मी वर्षभरानंतर निवृत्ती घेतली, पण खार तर त्याच दिवशी मी निवृत्ती घेतली हे सत्य आहे. पण मला त्यावेळी निवृत्तीची घोषणा करायची नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.