अज्ञात वाहनाची धडक ; हरीण गंभीर जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अज्ञात वाहनाचे धडकेत हरीण गंभीर जखमी झाल्याची घटना अंकलेश्वर महामार्गावर घडली असून वन्य प्रेमींनी जखमी हरिणीवर तात्काळ उपचार केल्याने ते बचावले आहे.

यावल पुर्व वन क्षेत्राच्या वन विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे हंबर्डी ता. यावल गावाजवळ बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर अज्ञात वाहनाचे धडकेत चितळ हरिण गंभीर जखमी अवस्थेत १५ जानेवारी रोजी आढळून आले.

यावेळी घटनेची माहिती दुरध्वनी व्दारे वनविभागास कळविण्यात आली. त्यानुसार उपवनसंरक्षक विवेक होशिंग, प्रथमेश हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक यावल, यांचे आदेश व मार्गदर्शनाने यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर , .रविंद्र तायडे ( वनपाल डोंगरकठोरा ) , राजेंद्र खर्चे (वनपाल), .भैय्यासाहेब गायकवाड (आगरवनरक्षक यावल ), तसेच वनर्मचारी अशोक माळी, .पंढरिनाथ बारी, महेश चव्हाण ,शरद पाटील, यांनी तात्काळ हंबर्डी येथे घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण गंभीर जखमी झाले होते.

हंबर्डी गावातील वनप्राणी मित्र आणी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी हरणास ताब्यात घेत शासकीय वाहनाने यावल येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आर.सी. भगुरे यांचे निरीक्षणात औषध उपचार करण्यात येत आहे. याप्रसंगी घटनास्थळी मनोज रामदास असत्कर, अमोल निबाळे फैजपूर,. धनराज पुरुषोत्तम तळेले, याकूब तडवी,इतबार तडवी,विलास तायडे उपस्थित होते.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.