अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत… चौकशीचे आदेश…

0

 

सिल्लोड, लोकशाही न्यूज नेटवर्क;

मोठ्या प्रमाणात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आले होते. त्यामुळे मंत्रिपदाचा हातातोंडाशी आलेला घास जातो की काय? एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, शिक्षण उपसंचालकांनी टीईटी प्रकरणात बरोबर मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या रात्री अब्दुल सत्तारांना क्लीन चिट देण्यात आली. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळाची माळ सत्तार यांच्या गळ्यात पडलीच. मात्र आता पुन्हा एकदा निवडणूक शपथपत्राबाबत न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये नव्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातील माहितीमध्ये तफावत आढळली आहे. या संदर्भात सिल्लोड न्यायालयाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.

सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली होती. मुख्यत्वे करुन या तक्रारीत म्हटले आहे की, सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावती आढळून आल्या आहेत. त्या अनुषंगाने सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा व्यवस्थित तपास न करुन सत्तार यांना अभय दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे आता न्यायालयाने पोलिसांना पुन्हा एकदा सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.