बोहर्डी आपघातातील मयताची ओळख पटली…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भुसावळ तालुक्यातील बोहर्डी जवळील राष्ट्रीय महामार्गावर दि २० सोमवार रोजी रात्री बस आपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मयताचे शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत होते, पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. त्यासंदर्भात तब्बल सहा दिवसांनी एक स्त्री आपल्या पतीच्या हरविल्या बाबत नोंद करण्यासाठी आली असता, सदर मयताच्या चप्पल वरून ओळख पटली असुन काहुरखेडा येथील रहिवासी आहे

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार, भुसावळ तालुक्यातील बोहर्डी जवळ राष्ट्रीय महामार्गावर दि २० शनिवार रोजीच्या रात्री सव्वा सात वाजेच्या सुमारास एस टी क्र एम एच १४ बी टी २६९८ या बसने अनोळखी पादचाऱ्यास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पोलीसात नोंद करण्यात आली होती. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन परिसरातील आसपासच्या गावात पोलिसांनी केले होते. ओळख पटविण्यासाठी अंगातील कपडे व पायातील चप्पल शिवाय काहीच नसल्याने तशी ओळख पटणे अवघड होते. शवगृहात चार दिवसापासुन ठेवलेल्या प्रेतावर पोलीस व नगर परिषदे मार्फत अतिम संस्कार करण्यात आले होते. मात्र, काहुरखेडा येथील छायाबाई दामोधरे यांचे पती मागील पाच दिवसापासून घरीच आले नसल्याने पोलीस स्टेशनला हरविल्या बाबत नोंद करण्यासाठी आल्या असता त्यांना, सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड व पोलीस उप निरिक्षक परशुराम दळवी यांनी सदर मयताचे अंगातील कपडे व चप्पल दाखविल्या नंतर मयताचे नाव तुकाराम रामा दामोधरे (४३) असे असल्याचे निष्पण झाले.  महिलेला आपला पती मृत झाल्याचे कळताच तिने एकच आक्रोश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.