धक्कादायक; चोरीचा खोटा आरोप लावला म्हणून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

खोटा चोरीचा आरोप लावल्यामुळे भडगाव येथील एका तरुणाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती पाचोरा पोलीसांना कळताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अर्नथ टळला. पोलिसांनी तरुणास ताब्यात घेत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जमा केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव पेठ मधील रहिवासी लक्ष्मण धुडकू पाटील याच्यावर एका व्यापाऱ्याने खोटा चोरीचा आरोप घेतला असल्याची माहिती लक्ष्मण पाटील या तरुणाने देत, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ६ जुलै गुरुवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान ते करत असतांना पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल सुनिल पाटील, पो. कॉ. विनोद बेलदार, सचिन पवार यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील होणारा अर्नथ टळला. लक्ष्मण धुडकु पाटील यास ताब्यात घेत पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी लक्ष्मण पाटील यांना समज देत पोलिस कर्मचाऱ्यांना तरुणास भडगाव येथे घेवुन जाण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.