तंदुरुस्त व्यक्तीलाच हृदयविकाराचा धोका अधिक : डॉ. कापडीया

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आपल्या तंदुरुस्तीबद्दल वृथा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीलाच हृदयविकाराचा धोका जास्त असतो. (People who take pride in their fitness are at higher risk of heart disease) कारण आपल्याला काहीही त्रास नाही, काहीही होत नाही, माझी तब्येत व्यवस्थित आहे असे म्हणत तो स्वतःकडे दुर्लक्ष करीत असतो आणि त्यामुळेच त्याला हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असल्याचे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ व युनिव्हर्सल हिलिंगचे जनक डॉ. रमेश कापडीया यांनी केले. रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद व मानद सचिव गिरीश कुळकर्णी होते.

आपल्या मनोगतात त्यांनी हृदयविकाराचे बळी ठरणाऱ्या युवकांकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतातील युवक हा जगाची संपत्ती असून सर्वांनी हृदयरोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने व्यापक जनजागृतीची आवश्यकता प्रतिपादित केली. ज्यांच्या परिवारात मागील पिढीत हृदयविकाराने दगावलेली उदाहरणे आहे त्या परिवार सदस्यांनी वयाच्या २१ व्या वर्षांपासून नियमित तपासणी केली पाहिजे विशेषतः एलडीएल कोलेस्ट्रॉल ७० पेक्षा जास्त असणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची सर्वाधिक शक्यता असते असे ते म्हणाले.

दैनंदिन औषधोपचारासह युनिव्हर्सल हिलिंगचा वापर करणे लाभदायक ठरते (Using Universal Healing along with daily medication is beneficial) असे प्रतिपादन त्यांनी केले. योग्य व संतुलित आहार, दररोज किमान ३०-४० मिनिटे चालणे, शरीराला मानवेल असा व्यायाम, शिथिलीकरणासाठी (रीलाक्सेशन) शवासन व अनुभवाचे सामायीकरण या पंचसूत्रीचा वापर लाभदायक ठरतो असे त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे स्पष्ट केले. आहारात तेलकट पदार्थांचा मर्यादित वापर केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. प्रश्नोत्तराद्वारे शंकानिरसन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. राजेश वेद यांनी परिचय करुन दिला तर नितीन चोपडा यांनी आभार मानले. गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रमेश संघवी, सौ. संघवी, योगेश दोषी, सौ. पूनम मानुधने, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डॉ. शुभदा कुळकर्णी, संदीप शर्मा, सुबोध सराफ, अमोल पाटील, मुकेश महाजन यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.