प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत -नारायण राणे

0

मुंबई (वृत्तसंस्था ) : शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचले होते. यावर भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील यावर एक प्रतिक्रिया देत ‘प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत,’ असं म्हणत नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला. ‘यावर मी काही सांगणार नाही. कायदेशीर गोष्टींवर आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. न्यायालयानं दिलेले निर्णय, ईडी, सीबीआय यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत. माध्यमांनी आधी त्यांची माहिती घ्यावी, ईडीचा छापा योग्य अयोग्य हे सांगावं मग आम्ही प्रतिक्रिया देऊ,’ असे नारायण राणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.