भडगाव | प्रतिनिधी
सध्या कोरोना आजाराने संबंध जगभरात प्रचंड थैमान घातले असून अनेक मोठे देश या आजाराच्या विळख्यात येत आहेत…सदर आजाराने महाराष्ट्रात देखील प्रसार झाला असून सदर आजाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्या अनुषंगाने सदर कोरोना आजाराबाबत विशेष मार्गदर्शन व जाणीव जागृती करण्यासाठी भडगाव येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सौ.पूनम प्रशांत पाटील यांनी शहरात प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जाऊन वैयक्तिक गाठीभेटी घेऊन सदर आजाराबाबत विशेष मार्गदर्शन व जाणीव जागृती केली व त्यांच्या वतीने मास्क चे मोफत वाटप देखील केले. डॉ.सौ.पुनम पाटील हे स्वत: वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी नागरिकांना अत्यंत साध्या सोप्या भाषेत सदर आजाराबाबत घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक बाबींवर वैयक्तिक मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या १४एप्रिल पर्यंत सर्व नागरिकांनी घरीच राहून आप आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन केले.