बोदवडात वर्तुळ आखून राबविण्यात आला सोशल डिस्टन्सचा उपक्रम

0

बोदवड | प्रतिनिधी 

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून या कोरोना संसर्गाच्या खबरदारीसाठी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्याकडून शहरात ठिकठिकाणी ३ मिटर अंतर ठेवत वर्तुळ आखून सोशल डिस्टन्स इन मेडिकल,दूध डेअरी,अत्यावश्यक सुविधा पुरविणा-या दुकानांसमोरील ग्राहकांसाठी विशेष उपाय योजना म्हणून व कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सचा अभिनव उपक्रम शहरात राबविण्यात आला.

शहरातील अत्यावश्यक सुविधा पुरवित असलेल्या दुकानांसमोर त्याचंबरोबर भाजी मार्केटमध्ये जातांना विशेष खबरदारी कशी घ्यावी?याबाबत प्रा.पाटील यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून  ‘घरातच रहा,सुरक्षित रहा’असा संदेश देत व आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

प्रा.हितेश पाटील यांच्याकडून  दूकानांच्या समोर खडूने सर्कल आखून व्यापा-यांमध्ये व नागरिकांमध्ये  जनजागृती करण्यात येत असून मेडिकल,भाजीपाला,फळे तसेच दूध डेअरीसमोर होणार्‍या गर्दीतून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रा.हितेश पाटील यांच्यावतीने सोशल डिस्टन हा अभिनव उपक्रम संपुर्ण शहरात आज राबविण्यात आला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक बांधीलकी म्हणून प्रा.हितेश पाटील यांच्या तर्फे दुकानांसमोर व नागरिकांमध्ये जनजागृती करून खडूने सर्कल आखून ‘सोशल डिस्टन्स’ हा अभिनव उपक्रम राबविला.

या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख मेहबूब,दिपक माळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.