श्रीराम मंदिराच्या ८ व्या गादीपदी अयोध्या येथील विष्णुदासजी महाराज विराजमान

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पाचोरा येथील जामनेर रोडवरील श्रीराम मंदिराच्या ८ व्या गादीपदी अयोध्या येथील विष्णुदासजी महाराज हे विराजमान झाले असून विष्णुदासजी महाराज यांनी पदभार स्वीकारला.

शहरातील जामनेर रोडवरील डिगंबर आखाडा श्रीराम मंदिरातील ८ व्या गादीपदी अयोध्या येथील विष्णुदासजी महाराज हे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी विराजमान झाले आहेत. सकाळी ११ वाजता महावीर गौड महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन, मंत्रोच्चार करत श्रीराम यांचे पुजन, पवनपुत्र हनुमान यांचे पुजन करत तसेच अगोदरचे गादीपदी संत दामोदरदास महाराज, रामचरणदासजी महाराज, प्रभुदासजी महाराज यांच्या समाधीचे पुजन करण्यात आले. तद्नंतर विष्णुदासजी महाराज यांना शाल व श्रीफळ देऊन गादीवर विराजमान करण्यात आले. याप्रसंगी नांद्रा ता. पाचोरा येथील विष्णुदासजी महाराज, गजानन जोशी, राधेश्याम दायमा, डॉ. निळकंठ पाटील, मनिष काबरा, जगदीश पटवारी, राधेश्याम अग्रवाल, किशोर संचेती, सुभाष अग्रवाल, अरविंद खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांचेसह शहरातील भाविक, व्यापारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.