३७ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

निमखेडी शिवारातील रहिवासी ३७ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिपक दिनकर भारंबे (३७) रा. पाडळसे ता. यावल ह.मु.निमखेडी शिवार, खोटे नगर, जळगाव येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दरम्यान यावल तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीतील झुडूपात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याची माहिती अद्याप मिळालेली नसून. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.