Sunday, January 29, 2023

तापी नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

- Advertisement -

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भुसावळ तालुक्यातील हतनूर गावातील तापी नदीच्या पुलावरून उडी मारुण आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, आयुध निर्माणी वसाहतीतील रहिवाशी अतूल सतिष वाणी (३२) रा क्वॉ न १७६ ए ( मोडीफाईड ) हे आपल्या परिवारा सोबत राहत असून, त्यांची बहीण प्रिया सतिष वाणी (३२) ही यांच्या सोबत राहत होती. दि २१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना घरातून निघुन, हतनूर गावा जवळील तापी नदीच्या पुलावरुन पाण्यात उडी मारली. येथे उपस्थीत असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्याने महिलेस वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता, तिला पाण्या बाहेर काढले मात्र तोवर उशीर झाला होता.

सदर मयत महिला हि घटस्फोटीत होती. आणि ती भावाकडेच राहत होती, घटस्पोट झाल्याने तिच्या मनावर परिणाम झाल्याने या पुर्वीही तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास स.पो.निरिक्षक आशिष आडसुड करीत आहे

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे