धक्कादायक; सहावीच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू…

0

 

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हार्ट अटॅक येन हे काही नवीन नाही आणि त्याच्या बऱ्याच केसेस आपण जवळून देखील बघितल्या आहेत. हार्ट अटॅक साधारण वयस्कर लोकांना यायचा. आता तरुणांनाही हार्ट येऊ लागला आहे. अशात आता तरुणांनंतर एका लहान मुलीलाही हार्ट अटॅक आल्याने खळबळ उडाली आहे. एका 13 वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या महबूबाबाद मारीपेडामधील अब्बैपलेम गावातील ही मुलगी, जिचं नाव बोडा श्रावंती असल्याचं सांगितलं जातं आहे. ती सहावीत होती. गुरुवारी रात्री तिला श्वास घ्यायला त्रास झाला. सामान्यपणे लहान मुलांना अशी समस्या होते, त्यामुळे पालकही फार गांभीर्याने घेत नाहीत. रात्री 12 च्या सुमारास ती अचानक उठली. तिने आपल्या आजीला उठवलं. आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. छातीत दुखतं आहे, असं तिने सांगितलं. घऱच्यांना वाटलं की तिला गॅस किंवा काही सामान्य समस्या असेल. त्यामुळे त्यांनी घरच्या घरीच उपचार केले. पण हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं, याचा कधी कुणी विचारही केला नसेल. तिची प्रकृती खूपच बिघडली म्हणून तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण त्याआधीच ती खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.