धक्कादायक; १२ वीच्या विद्यार्थिनीचा डोक्यात ताप शिरून दुर्दैवी मृत्यू…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

परीक्षेचा काळ म्हटला म्हणजे मुलांच्या समोर अभ्यास एके अभ्यास हा पाढा सुरु होतो. त्यामुळे त्याची मानसिकता हि फक्त त्या दृष्टीने तयार होते. आणि त्याचा ताण ते अतिरिक्त घेतात. अशातच या काळात टेन्शमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आणि यातून विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी शिळी इडली खाल्याने विषबाधा होऊन बारावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरातही विद्यार्थींनीला जीव गमवावा लागला आहे. कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रावणी अरुण पाटील (18) असे त्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

मागच्या काही दिवसांपासून 12वीच्या परिक्षा सुरू आहेत. दरम्यान कोल्हापुरातील श्रावणी बारावी इयत्तेत शिक्षण घेत होती. सध्या बारावीची परीक्षा सुरू असून उर्वरित विषयांच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना श्रावणीला अचानक ताप आला. अवघ्या काही तासात ती पूर्ण आजारी पडली अन् आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच तिने प्राण सोडले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रावणी पाटील ही शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. सध्या तिची बोर्डाची परीक्षा सुरू असून उर्वरित पेपरचा तिचा अभ्यास सुरू होता. मात्र मागील तीन-चार दिवसांपासून तिला अचानक ताप, सर्दी आणि खोकला याचा त्रास सुरू झाला. यामुळे आई-वडिलांनी तिला तत्काळ फुलेवाडी येथीलच एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तीन ते चार दिवसाच्या उपचारानंतर श्रावणी बरी देखील झाली. यामुळे तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान तिला घरी आणल्यानंतर तिने पुन्हा अभ्यास सुरू केला. मात्र सोमवारी रात्री पुन्हा तिला ताप आल्यामुळे रात्री उशिरा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ती बेशुद्ध झाली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान, केवळ ताप आल्याने डोळ्यासमोर आपली मुलगी जग सोडून गेल्याने तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.