12 जुलैपासून मिळणार स्वस्त सोने, सरकार देईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी

0

नवी दिल्ली

जर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक  करायची असेल तर सोमवारपासून सुवर्णसंधी आहे. 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरीजची विक्री सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपासून चालेल. रिझर्व्ह बँकद्वारे जारी निवेदनानुसार, या सीरीजमध्ये प्रति ग्रॅम गोल्डची किंमत 4,807 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. सॉवरेन गोल्ड बाँड  आरबीआय सरकारकडून जारी करते.

ऑनलाइन खरेदी केल्यास मिळेल सूट

सॉवरेन गोल्ड बाँड 2021-22 चा चौथा हप्ता सोमवारपासून पाच दिवसासाठी सबस्क्रीपशनसाठी खुला राहील. बाँडसाठी ऑनलाइन अर्ज केला तर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजे एक ग्रॅम गोल्ड बाँडची किंमत 4,757 रुपये असेल.

कुठे खरेदी करू शकता बाँड ?

हे बाँड सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज), NSE आणि BSE च्या माध्यमातून विकले जातील. स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमध्ये याची विक्री होत नाही. एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती कमाल 4 किग्रॅ सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे.

सॉवरेन गोल्ड बाँडचे फायदे

– मॅच्युरिटीवर सॉवरेन बाँड टॅक्स फ्री होतात.

– केंद्र सरकारची स्कीम असल्याने जोखीम नाही.

– फिजिकल गोल्ड ऐवजी बाँड मॅनेज करणे सोपे असते.

– शुद्धतेबाबत शंका रहात नाही. 24 कॅरेट गोल्ड असते.

– एग्झिटचा सोपा पर्याय आहे. गोल्डवर लोन सुविधा मिळते.

– मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षाचा असतो, 5 वर्षानंतर विकण्याचा पर्याय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.