जिल्हा परिषद व पंचायत समिती केंद्रावर मतदान

0

लोकशाही न्युज नेटवर्क; 

 

भंडारा :जिल्हा परिषद व पंचायत समिती केंद्रावर मतदान. दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठी आज जिल्ह्यातील ६०१ मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. तर, तीन लाख ६७ हजार ५०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १९८ उमेदवार रिंगणात असून, प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. आज सकाळी साडेसात वाजतापासून मतदानास सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी ६७, तर पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवार (दि. १८) सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडत आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, ५ हजार ७२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रमुख मतदान अधिकारी, असे एकूण ६९१ जणांची नियुक्त करण्यात आली आहे. मतदान अधिकारी ६८९, शिपाई ६०१, पोलीस शिपाई ६५७, बीएलओ ५७० आणि आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अशा ४८२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ६०१ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, त्यात तुमसर तालुक्यात ११९, मोहाडी १०२, साकोली ३८, लाखनी १२४, भंडारा ९१, पवनी ८९ आणि लाखांदूर तालुक्यात ३८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. ३ लाख ६७ हजार ५०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ८५ हजार ७१५ तर महिला मतदारांची संख्या १ लाख ८१ हजार ७९३ आहे.

जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांची एकत्रित मतमोजणी बुधवारी (दि. १९) तालुका मुख्यालयी होणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मतमोजणीच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेतली जाणार आहे.

तालुकानिहाय मतदार संख्या

तालुका – मतदान केंद्र – पुरुष स्त्री – एकूण

तुमसर – ११९     ३५८६४ ३४८२९ ७०६९२

मोहाडी – १०२ ३३८४९ ३३४९६ ६७३४५

साकोली – ३८ ११३०० १०८०७ २२०१७

लाखनी – १२४ ३६३३४ ३५९५८ ७२२९२

भंडारा – ९१ २८५८८ २८३०६ ५६८९४

पवनी – ८९ २८४२७ २७२५७ ५५६८४

लाखांदूर – ३८ ११३५३ १११४१ २२४९४

एकूण – ६०१ १८५७१५ १८१७९३ ३६७५०८

मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी

भंडारा – ८३८

पवनी – ८१५

तुमसर – ९१७

मोहाडी – ८८६

साकोली – ३४३

लाखनी – ९६१

लाखांदूर – ३३२

एकूण – ५०७२

Leave A Reply

Your email address will not be published.