अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी…; 10 जणांचा मृत्यू…

0

 

मृतांचा आकडा वाढण्यासह अनेक यात्रेकरू अडकल्याची भीती : पवित्र गुहेजवळ फुटला ढग
अमरनाथ
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने 3 महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी विमानाने रूग्णालयात हलवण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी ढग फुटले त्यावेळी गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. अद्याप 40 हून अधिक यात्रेकरू अजूनही अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोलीस, एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या असून मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अमरनाथ गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर ही ढगफुटीची घटना घडली. डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचे प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि दोन लंगर वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांच्या सामानाचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने लष्कर, आयटीबीपी, सीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये नेण्यात येत आहे.
अमरनाथ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा 30 जूनपासून ही यात्रा सुरू झाली आहे. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. या यात्रेत आतापर्यंत 65 हजारांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. परंतु, खराब हवामानामुळे 2 ते 3 दिवस प्रवास थांबवावा लागला होता.
अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्याने ट्विट करत म्हटले आहे की, ‘बाबा अमरनाथच्या गुहेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुराच्या संदर्भात मी एलजी मनोज सिन्हा यांना आवाहन केले. तसेच परिस्थितीचा आढावा देखील घेतला. लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.