थेट खिशाला कात्री ! 1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

दर महिन्याला नवीन आर्थिक नियम लागू करण्यात येतात. येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा अनेक नियम बदलणार असून थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे काही नियम बदलले आहेत. हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. 1 डिसेंबरपासून लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. आता रेगेलिया क्रेडिट कार्डधारक केवळ खर्चाच्या आधारावर लाउंजमध्ये प्रवेश करू शकणार आहे. लाउंज प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी, क्रेडिट कार्ड युजर्सना एका कॅलेंडर तिमाहीत (जानेवारी-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर) रुपये 1 लाख किंवा त्याहून अधिक खर्च करावे लागतील.

म्हणजेच, कोणत्याही तिमाहीत 1 लाख रुपयांचे व्यवहार केल्यानंतरच तुम्ही लाउंज वापरण्यास सक्षम असाल. स्मार्ट बाय पेज आणि लाउंज बेनिफिट्स पेजला भेट देऊन ग्राहकाला लाउंज व्हाउचरचा दावा करावा लागेल. तरच तो त्याचा लाभ घेऊ शकेल. बँकेने सांगितले की, जेव्हा ग्राहक खर्चाबाबतचा नियम पूर्ण करेल तेव्हाच त्याला कार्डवर लाउंज प्रवेशाचा लाभ घेता येईल.

यानंतर केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम बदलले आहेत. हे नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करता येणार आहेत. नवीन नियमांनुसार, सिम कार्ड विक्रेत्यांना नोंदणी करण्यापूर्वी आणि सिस्टममध्ये सामील होण्यापूर्वी केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल.

एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ठरतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन किमती जाहीर केल्या जातात. या काळात मागणी वाढल्याने लग्नाच्या मोसमात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तर, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात इंधन कंपन्यांकडून दिलासा मिळणार का, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.